गुजरातमधील मेडिकल गॅस उत्पादन केंद्रात स्फोट; 8 ठार

वडोदरा : गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातल्या मेडिकल गॅस उत्पादन केंद्रामध्ये झालेल्या स्फोटामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे. हा स्फोट पाड्रा तालुक्‍यातल्या गवासाड गावातल्या एम्स इंडस्ट्रीजमध्ये सकाळी 11 वाजता झाला. पाड्रा जाम्बुसार महामार्गापासून हा प्रकल्प काही अंतरावर आहे.

स्फोटात मरण पावलेले बहुतेक जण या ठिकाणी काम करणारे कामगार आहेत, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. स्फोटात जखमी झालेल्या 6 जणांना वडोदराजवळच्या आतलदरा येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे, असे पोलीस अधिक्षक सुधीर देसाई यांनी सांगितले.

गॅस सिलिंडरमध्ये भरला जात असताना हा स्फोट झाला होता. या स्फोटाचे नेमके कारण शोधण्यासाठी फॉरेन्सिक लॅबोरेटरीच्या अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. फॉरेन्सिक तपासणीच्या आधारे मिळणाऱ्या पुराव्यांच्या आधारे “एफआयआर’ दाखल केली जाईल आणि या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांना जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही पोलिसांनी सांगितले.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.