उत्तर प्रदेशात फटाक्‍याच्या कारखान्यात स्फोट; 5 ठार

मुझफ्फरनगर: उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील एका फटाक्‍याच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात पाच मजूरांचा मृत्यू झाला आहे. हे पाचही मजूर कारखान्यात काम करत असताना हा स्फोट झाला. दरम्यान, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

निर्मला देवी, नरेसो देवी, शंकी, राजेंद्र सरस्वती देवी आणि विरेंद्रे इंतजार अशी मृतांची नावे आहेत.ही दुर्देवी दिल्ली-सहारनपूर महामार्गावरील कांधला येथे आज सायंकाळी साडे चार वाजता घटना घडली. कांधली येथील फटाक्‍याच्या कारखान्यात सायंकाळी अचानक स्फोट झाला. हा स्फोट प्रचंड भीषण होता की, यामुळे कारखान्याचे छप्पर आणि भिंतीही कोसळली.

क्षणार्धात जाळ आणि धुराचे लोट पसरल्याने कारखान्यातील इतर कामगारांची एकच धावपळ उडाली. स्फोटाचा आवाज काही किलोमीटरपर्यंत ऐकायला मिळाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दरम्यान या घटनेनंतर पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. हा स्फोट नेमका कशामुळे झाला याची अद्याप माहिती मिळालेली नाही. या स्फोटातील मृतांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.