आज पुन्हा उलगडणार इतिहासातील सोनेरी पान

झी युवा वाहिनीवर अनुभवा 'फत्तेशिकस्त' चित्रपटाचा थरार

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या एका थरारक गनिमी काव्यावर आधारित ‘फत्तेशिकस्त’ या मराठी चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफीवर प्रचंड धुमाकूळ घातला होता. ‘फत्तेशिकस्त’ चित्रपट शिवाजी महाराजांचा गनिमीकावा आणि त्यांच्या युद्धनीतीवर आधारती आहे. चित्रपटाच्या निमित्ताने शत्रूच्या गोटात घुसून मारणारी शिवरायांची युद्धनिती प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली.

दरम्यान, झी युवा वाहिनीवर आज (दि. 27) रविवार दुपारी 12 आणि संध्याकाळी 7 वाजता पुन्हा एकदा प्रेक्षकांना महाराजांचा गनिमीकावा आणि त्यांच्या युद्धनीतीचा थरार अनुभवायला मिळणार आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटात विविध कलाकारांची फौज पहायला मिळतेय.

अभिनेता चिन्मय मांडलेकर याने चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. त्याच्यासोबत मृणाल कुलकर्णी, निखिल राऊत, हरीश दुधाडे, अजय पुरकर, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, नक्षत्रा मेढेकर यांसारखी दमदार स्टारकास्टही या चित्रपटात दिसणार आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.