सिमला – हिमाचल प्रदेशाच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला असून या मंत्रिमंडळात तीन नवीन मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. सुखराम चौधरी, राकेश पठाणिया आणि राजिंदर गर्ग अशी मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आलेल्या तीन नवीन मंत्र्यांची नावे आहेत.
त्यांचे खातेवाटपही जाहीर करण्यात आले असून सखराम चौधरी यांना ऊर्जा आणि बहुउद्देशीय प्रकल्प ही खाती देण्यात आली आहेत. पठाणिया यांना वन खात्याचा कारभार देण्यात आला असून गर्ग यांना अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचा कार्यभार देण्यात आला आहे. या नवीन मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच विद्यमान मंत्र्यांचा खांदेपालटही यावेळी करण्यात आला.
गृह आणि अर्थ ही महत्त्वाची खाती मुख्यमंत्र्यांकडेच कायम ठेवण्यात आली आहेत. राज्यात ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली डिसेंबर 2017 मध्ये सरकार सत्तेवर आले. त्यानंतर करण्यात आलेला हा पहिलाच विस्तार आहे.