मागील वीस वर्षांपासून एक्झिट पोलचे आकडे चुकीचे – उपराष्ट्रपती

नवी दिल्ली – विविध वाहिन्यांनी एक्‍झिट पोलची आकडेवारी जाहींर केल्यानुसार पुन्हा एकदा मोदी सरकार प्रस्थापित होण्याची चिन्हे दिसत आहे. परंतु, मागील वीस वर्षांपासून एक्झिट पोलचे आकडे चुकले आहेत. हे वास्तविक आकडे नसतात, असे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हंटले आहे. ते गुंटूरमध्ये बोलत होते.

व्यंकय्या नायडू म्हणाले कि, एक्झिट पोल वास्तविक नसतात. १९९९ पासून अधिक वेळा एक्झिट पोल चुकीचे ठरले आहेत. प्रत्येक पक्ष आपला यशाबद्दल आश्वस्त असते. मतमोजणीपर्यंत हा विश्वास दर्शविला जातो. याला कोणताही आधार नसतो. आपल्याला २३ मेपर्यंत वाट पाहायला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. देश आणि राज्याला एक कुशल नेता आणि सरकारची गरज असते, असेही नायडू यांनी सांगितले.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या सातव्या टप्प्यांचे पार पडल्यानंतर विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांनी एक्‍झिट पोलची आकडेवारी जाहींर केली आहे त्यानुसार देशात आता पुन्हा नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वाखालील एनडीए आघाडीचेच सरकार पुर्ण बहुमत मिळवून सत्तेवर येण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×