एक पैसाही खर्च न करता येणारा व्यायाम म्हणजे, ‘चालणे’

-दीपक महामुनी

सर्व प्रकारच्या व्यायामातील सर्वोत्तम व्यायाम म्हणजे चालणे. याची कारणे अनेक आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यासाठी कुठल्याही प्रकारच्या साधनांची गरज नाही. त्यासाठी कोणताही खर्च नाही, कोणत्याही वयात तुम्ही तुमच्या सोईनुसार कधीही चालू शकता. पण सकाळची वेळ ही त्यासाठी सर्वांत उत्तम असते.

दररोज नियमाने आणि पद्धतशीरपणे पाच किलोमीटर चालल्यास आयुष्यात तुम्ही कायम तंदुरुस्त राहाल. चालण्याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे त्यातून एकावेळी शारीरिक आणि मानसिक व्यायाम होत असतो. रोज दहा हजार पावले चालणे ही दीर्घायुष्याची गुरूकिल्ली आहे. साधारणपणे दररोज तुम्ही तीस मिनिटे चाललात तर तुमच्या दोनशे कॅलरी खर्च होतात. चालण्याचा व्यायाम हा पाठीचे दुखणे, ह्रदयरोग, उच्च रक्‍तदाब, श्‍वासाचा त्रास हे सर्व नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिशय लाभदायक आहे.

थोड्या वेगात, लयबद्ध रीतीने आणि ज्यात पावलांवर कमी दाब पडतो अशी शारीरिक क्रिया म्हणजे फिटनेस वॉकिंग. फिटनेस वॉकिंग म्हणजे जोरात पळणे नव्हे किंवा जॉगिंगही नव्हे. फिटनेस वॉकिंगमुळे ह्रदयाची गती वाढते. फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते. चयापचय संस्था सुधारते. शरीरातील कॅलरी खर्च होतात. शिवाय त्यामुळे कोणताही त्रास होण्याची शक्‍यता नसते. त्याचप्रमाणे कोणत्याही वयात आपण हा व्यायाम करू शकता. वजन कमी करण्याचा किंवा राखण्याचा हा उत्तम मार्ग आहे.

चालणे-एक लाभदायक व्यायाम

पायी चालणे हा अतिशय सुंदर व्यायाम आहे. त्यामुळे तणाव कमी होतो. झोपही चांगली लागते. चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठऱते. दिवसभर काम करून आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो. शिवाय हाडांची मजबुतीही चालण्यामुळे वाढते. आजकाल लोकांचे चालणे फारच कमी झाली आहे. पूर्वी लोक मैलच्या मैल चालत असत. तेव्हा प्रवासाची साधनेही नव्हती, त्यामुळे चालणे अपरिहार्य होते. आता वाहने मुबलक झाली आहेत. सार्वजनिक प्रवासाची साधनेही विपुल झाली आहेत. त्याने वेळ वाचतो हे खरे असले, तरी चालणे हा प्रकार कमी झाला आहे. देवाने दिलेल्या दोन पायांचा आपण पुरेसा वापर करत नाही हे कटू सत्य आहे.

सायकल, टांगा, बग्गी यांसारखी वाहने आता कालबाह्य झाली आहेत. टू व्हीलर्स, ऑटो, कार, बसेस अशी अनेक प्रकारची प्रवासाची साधने उपलब्ध असल्याने आणि पैसाही असल्याने माणसाला शारीरिक श्रम करण्याची वृत्ती राहिलेली नाही. सतत गाड्यांचा वापर करण्यामुळे पायी चालणे आपण जवळपास विसरून चाललो आहोत. त्याचे अनेक तोटे आपल्याला सहन करावे लागत आहेत. आजकाल थोडे चाललो तरी आपल्याला अनेकदा दम लागतो. थोडेही चालल्यानंतर दम लागत असेल, थकवा जाणवत असेल, तर तो आपल्या शरीराने आपल्याला दिलेला इशारा आहे. धोक्‍याची सूचना आहे हे लक्षात घ्या आणि आवश्‍यक काळजी घ्या. चालायची संधी मिळाली तर सोडू नका. उलट व्यायाम म्हणून नियमित किमान 30 मिनिटे चालण्याची सवय लावून घ्या. रमत गमत चालणे म्हणजे चालण्याचा व्यायाम नाही ही गोष्ट समजून घ्या.

सर्व प्रकारच्या व्यायामातील सर्वोत्तम व्यायाम म्हणजे चालणे. याची कारणे अनेक आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यासाठी कुठल्याही प्रकारच्या साधनांची गरज नाही. त्यासाठी कोणताही खर्च नाही, तुम्ही तुमच्या सोयीनुसार कधीही चालू शकता. पण सकाळची वेळ ही त्यासाठी सर्वात उत्तम असते. दररोज नियमाने आणि पद्धतशीरपणे पाच किलोमीटर चालल्यास आयुष्यात तुम्ही कायम तंदुरूस्त राहाल. चालण्याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे त्यातून एकावेळी शारीरिक आणि मानसिक व्यायाम होत असतो. रोज दहा हजार पावले चालणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे.

चालणे एक लाभदायक व्यायाम – (भाग 2)

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.