व्यायामाचा ताण हृदयावर नको (भाग 2) 

-डाॅ. श्वेता चिकले  

व्यायामाचा ताण हृदयावर नको (भाग 1) 

आयुष्यभर माफक प्रमाणात व्यायाम करणे हितकारक असते. प्रमाणापेक्षा अधिक व्यायाम केला तर हृदयाच्या ठोक्‍यांच्या लयीमध्ये अडथळा निर्माण होऊन अट्रिअल फायब्रिलेश (विकंपन) होऊ शकते. त्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो आणि अशक्‍तपणा येऊ शकतो किंवा धाप लागू शकते. या कारणांमुळे व्यायाम मर्यादित करायला हवा आणि अति व्यायाम केल्यास हृदयाला लाभ होण्याऐवजी हृदयाच्या रक्तवाहिन्यांवर त्याचा विपरित परिणाम होऊ शकेल, याची जाणीव होणे आवश्‍यक आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पेनकिलरपासूनही सावध रहा…

आजकालच्या तरुणांमध्ये सहनशक्ती अजिबात राहिलेली नाही. कारण जरा काही दुखायला लागलं की ही मंडळी लगेच पेनकिलरला पसंती देतात. त्यांना डॉक्‍टरांकडे जायचाही कंटाळा येतो. दुखण्यावर कुठलंही मलम लावण्यापेक्षा ते पेनकिलरलाच अधिक पसंती देतात. या पेनकिलरमुळे आपल्याला तत्काळ बरं वाटतं यामुळेच त्या गोळ्यांची सवय होते.
सवय याचा अर्थ असा की या गोळ्या आपण वारंवार घेतो. अशा रीतीने या पेनकिलरची हळूहळू सवय होते आणि आपण प्रत्येक वेळी या गोळ्या घेतो मात्र या गोळ्या हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक असतात.

केवळ हृदयाचं आरोग्यच नव्हे तर ब्रेन स्ट्रोकचादेखील धोका यामुळे संभवतो. कारण या गोळ्यांमध्ये आयब्रूफेन आणि डाइक्‍लोफेनैकसारखी केमिकल्स असतात. ही केमिकल्स हृदयाची गती अनियमित करतात. यामुळे ऑट्रियल फिब्रिलेशनचा धोका वाढतो. या स्थितीत हृदयाचे ठोके इतके वाढतात की हार्ट ऍटॅकचा धोका अधिक असतो. या पेनकिलर शरीरात साइक्‍लोऑक्‍सिजन नामक इंझाइमला बाधित करतं. त्यामुळे रक्तदाब वाढतो जेणेकरून ठोक्‍यांची अनियमितता वाढते. म्हणूनच सातत्याने पेनकिलर घेतल्यामुळे हार्टऍटक येण्याचा धोका तीन टक्क्‌यांनी वाढतो. म्हणून शक्‍य असेल तितकं या गोळ्यांपासून लांबच राहा. तुमच्या दुखण्यापासून तुम्हाला लांब राहायचं असेल तर तुम्ही योगधारणा, ध्यान, योग्य आहार आणि नियमित दिनचर्येचा अवलंब केला पाहिजे.

पुणेकर पुरुष उच्च रक्तदाबाचे शिकार

विशेषत: पुण्याच्या बाबतीत हे सर्वेक्षण करण्यात आले होते. यासाठी तणाव व आजारांच्या लक्षणांकडे दुर्लक्ष हे कारण असल्याचे दिसून आले आहे. प्रतिबंधात्मक आरोग्य तपासण्या करून घेतलेल्या 23,145 लोकांच्या आरोग्यविषयक अहवालांनुसार पुणेकरांमध्ये स्थूलपणा, मधुमेह व हृदयविकार यांसारखे जीवनशैली आजारांचे प्रमाण जलदगतीने वाढत असून पुण्यातील श्रमजीवी लोकांमध्ये तणावरहित उच्च रक्‍तदाबाचे प्रमाण 4 टक्‍क्‍यांनी वाढले आहे.

पुण्यामधील स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये (35 ते 40 वर्षे) उच्च रक्‍बदाबाचे प्रमाण अधिक आहे. हा आजार फक्‍त वृद्ध वयोगटातील व्यक्‍तींना नसून, 20 वर्षे वयोगटातील युवांमध्येसुद्धा हा आजार आढळून आला आहे. बैठी जीवनशैली, शारीरिक व्यायामाचा अभाव अशा कारणांमुळे लोकांमध्ये उच्च रक्‍तदाबाचे प्रमाण वाढत आहे.

जर योग्य वेळेवर उपचार घेतला नाही, तर हृदयविषयक आजार, मूत्रपिंड व इतर अवयव निकामी होणे असे आजार होऊ शकतात. वेळेवर व नियमित तपासणी उच्च रक्‍तदाबाचा धोका कमी करु शकते.

-पुण्यामधील स्त्रियांपेक्षा जास्त पुरुष उच्च रक्‍तदाबाने पीडित आहेत, पुरुष-स्त्रीचे प्रमाण 23ः22 आहे
-तणाव, व्यायामाचा अभाव, बाहेरील पदार्थांचे अधिक प्रमाणात सेवन अशा कारणांमुळे 22 वर्षे वयोगटातील युवा लोक रक्‍तदाबापासून पीडित आहेत. आयटी विभागातील 25 ते 35 वर्षे वयोगटातील युवक अधिक प्रमाणात रक्‍तदाबापासून पीडित आहेत
-एकूण पैकी 22 टक्‍के ऍब्नॉरमॅलिटी पुरुषांमध्ये आढळून आली, असे आढळून आले की त्यांच्यापैकी 8 ते 10 टक्‍के पुरुष रक्‍तदाबापासून पीडित होते आणि त्यांना मूत्रपिंडविषयक विकारांचा त्रास होता.
-गोड पदार्थांच्या अतिसेवनामुळे 45 ते 55 वर्षे वयोगटातील 7 ते 9 टक्‍के लोकांना रक्‍तदाबाचा धोका आहे, मधुमेहाचाही आहे
-युवा वयोगटातील 15 ते 20 टक्‍के व्यक्‍तींनी अस्वस्थता, अचानक घाम येणे व उच्च तणाव पातळ्यांविषयी तक्रारी केल्या आहेत
-45 टक्‍के लोकांना उच्च रक्‍तदाबाची जाणीव आहे, पण ते कोणत्याही प्रकाराचा उपचार घेत नाहीत. 20 टक्‍क्‍याहून अधिक युवक जंक फूडचे सेवन करतात, ज्यामुळे स्थूलपणा वाढतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)