व्यायामाचा ताण हृदयावर नको (भाग 1) 

-डाॅ. श्वेता चिकले

आयुष्यभर माफक प्रमाणात व्यायाम करणे हितकारक असते. प्रमाणापेक्षा अधिक व्यायाम केला तर हृदयाच्या ठोक्‍यांच्या लयीमध्ये अडथळा निर्माण होऊन अट्रिअल फायब्रिलेश (विकंपन) होऊ शकते. त्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो आणि अशक्‍तपणा येऊ शकतो किंवा धाप लागू शकते. या कारणांमुळे व्यायाम मर्यादित करायला हवा आणि अति व्यायाम केल्यास हृदयाला लाभ होण्याऐवजी हृदयाच्या रक्तवाहिन्यांवर त्याचा विपरित परिणाम होऊ शकेल, याची जाणीव होणे आवश्‍यक आहे.

इष्टतम व्यायाम पातळी

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दररोज साधारण 45-50 मिनिटे व्यायाम करावा. यात 30% अंगमेहेनतीचा व्यायाम असावा. या व्यायामामुळे तुम्हाला घाम येणे अपेक्षित आहे. 2015 साली प्रकाशित झालेल्या काही अहवालांनुसार ज्या व्यक्ती दर आठवडय़ाला 450 मिनिटे व्यायाम करतात त्यांना दीर्घकालीन आयुष्याचा संदर्भ लक्षात घेता व्यायाम न करणाऱ्यांच्या तुलनेत 39% लाभ होतो.

परंतु ज्या व्यक्ती दिवसाला तीन तास व्यायाम करतात त्यांना हा लाभ केवळ 30% होतो. म्हणजेच आठवडय़ाला 150 मिनिटे व्यायाम करणाऱ्यांइतकाच तो असतो. ज्यांना हृदयविकार अनुवंशिक असलेल्या व्यक्ती लांब अंतर धावल्या तर त्यांना अहिदमियास, डायास्टॉलिक डिसफंक्‍शन इत्यादी हृदयविकार जडू शकतात. हे एन्डय़ुरन्स ऍथलिट्‌समध्ये आढळणारे विकार आहेत.

अति व्यायामाचे परिणाम

बहुतेक पेशींमध्ये मायटोकॉन्ड्रिअन आढळते आणि पेशींच्या चयापचयास मदत करणारे रसायन त्यात असते. व्यायामादरम्यान मायटोकॉन्ड्रिया अधिक कष्ट करतात आणि त्यामुळे आरोग्य सुदृढ राहते आणि दीघार्युष्य लाभते. औषधांप्रमाणेच व्यायामाचा सुद्धा सुयोग्य डोस घेणे आवश्‍यक असते. अति व्यायामामुळे विकार जडण्याची आणि लवकर मृत्यू येण्याची शक्‍यताही अधिक असते. जेव्हा तुम्ही अतिपरिश्रम करता तेव्हा हृदय वहन यंत्रणेवर ताण पडतो. त्यामुळे असाधारण लय निर्माण होते आणि दीर्घकाळाचा विचार करता हृदय बंद पडू शकते.

प्रत्येक व्यायामाच्या शेडय़ुलनंतर स्नायूंचे मायक्रोस्कोपिक नुकसान होत असते आणि तुम्ही किती तीव्र स्वरूपाचा व्यायाम केला आहे, त्यावर त्याला ते नुकसान भरून काढण्यास सुमारे 24 ते 48 तासांचा अवधी लागतो. अलीकडेच ऑस्ट्रेलियातील क्रीडा नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार अति व्यायामामुळे गट लायनिंक कमकुवत होते आणि घातक विषारी घटक आणि जीवाणूंना रक्‍तप्रवाहात येणे शक्‍य होते. तुम्ही बऱ्याच काळापासून
अति व्यायाम करत असाल तर तुमच्या शरीरातील संप्रेरकांवरही परिणाम होतो. कॉरिस्टॉलची पातळी वाढते.

त्यामुळे तुमच्या शरीरावर प्रतिकूल परिणाम होतात. त्याचप्रमाणे दोन व्यायामाच्या शेडय़ुलदरम्यान किमान आठ तासांची झोप घेणे आवश्‍यक आहे. त्यामुळे तुमचे शरीर आपोआप झीज भरून काढते. त्याचप्रमाणे आहार व्यवस्थित असावा. आहारामध्ये मासे, त्वचारहीत चिकन, फळे, पालेभाज्या, शेंगा, तृणधान्ये इत्यादींचा समावेश असावा. पोषक गरजा पूर्ण केल्या गेल्या नाहीत तर शरीराची झीज व्यवस्थित भरून काढली जात नाही.

प्रतिकारक यंत्रणा कमकुवत होते आणि त्यामुळे तुम्ही वारंवार आजारी पडता. त्याचप्रमाणे तुमच्या शरीरावर ताण पडत असेल तर तुम्ही चिडचिडे होता, नैराश्‍य येते, राग येतो. त्याचा तुमच्या मनावरही परिणाम होतो. कॉरिस्टॉलची पातळी खूप जास्त काळ वाढलेली असेल तर शरीर चरबी साठवून ठेवयाला लागते. त्यामुळे चरबी कमी करण्याच्या उद्दिष्टाने व्यायाम सुरू केला असला तर अतिव्यायामाने नेमका उलटा
परिणाम होतो.

व्यायामाचा ताण हृदयावर नको (भाग 2) 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)