सातारा – प्रजासत्ताक दिनानिमित्ताने येथील छत्रपती शिवाजी कॉलेजच्या एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांनी रोमहर्षक कवायती आणि चितथराक युद्ध प्रात्यक्षिके सादर करून शहीद जवानांना मानवंदना दिली.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांनी जवानांचे कठोर प्रशिक्षण व कवायत सादर करून सीमेवरील कर्तव्यदक्ष सैनिकांचे जीवन प्रात्यक्षिकाद्वारे दाखवले. त्यानंतर अचानक अंधाधुंद गोळीबार करत अतिरेकी छावणीत घुसून व निशस्त्र सैनिकांवर हल्ला करतानाच्या दृश्याने उपस्थितांचे मन हेलावून गेले. भारतीय थलसेनेच्या सशस्त्र सैनिकांनी चारही बाजूंनी कुच करत अतिरेक्यांना ठार करतानाचे चित्तथरारक दृश्य पाहून प्रेक्षकांनी “भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या. याप्रसंगी छत्रपती शिवाजी कॉलेजच्या मैदानाला युद्ध भूमीचे स्वरुप प्राप्त झाले होते. शहीद जवानांना शस्त्र सलामी देऊन प्रात्यक्षिकांची सांगता झाली.
रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
कॉलेजच्या उपप्राचार्या डॉ. सौ. अनिसा मुजावर व एन.सी.सी. ऑफिसर लेफ्टनंट केशव पवार यांच्या मर्गदर्शनाखाली सिनियर अंडर ऑफिसर अक्षय कांबळे, वैभव भोसले, प्रणाली शेलार, घोरपडे, सौरभ ढाणे, प्राजक्ता शिंदे, खुशी जहांगीड, अकांक्षा मोरे, सना शेख यांनी प्रात्यक्षिकांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. सूरज लांडगे, अक्षय कांबळे व प्रथमेश शेडगे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम
घेतले.