खळबळजनक..! 24 तासांत तब्बल 390 जण पॉझिटिव्ह

खेडमध्ये व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन बेडची कमतरता

राजगुरूनगर – खेड तालुक्‍यात मागील 24 तासांत 390 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. तर चार व्यक्तींचा मृत्यू झाल्याने तालुक्‍यात हाहाकार उडाला आहे. एकाच दिवसात 400 रुग्ण संख्या गेली आहे. तालुक्‍यात अगोदरच व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन बेडची कमतरता, बाधितांची संख्या वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीजन्य वातावरण पसरले आहे.

तालुक्‍यात आजअखेर 1724 बाधित विविध दवाखान्यात उपचार घेत आहेत. 24 तासात म्हाळुंगे 35, खालूंब्रे 23, कुरुळी 21 शेलपिंपळ्गाव 15, मेदनकरवाडी 15, खराबवाडी 11, चिंबळी 10 इतक्‍या पॉझिटिव्ह व्यक्ती सापडले आहे. खेड तालुक्‍यात मागील 24 तासांत चाकण 30, आळंदी 10, राजगुरूनगर 14 या नगरपरिषदांच्या हद्दीत 54 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत.

ग्रामीण भागातील कनेरसर, निमगाव गावात प्रत्येकी एक पॉझिटिव्ह, कडूस, कोरेगाव खुर्द, कुरकुंडी, ढोरे भांबुरवाडी, रोहकल, सांडभोरवाडी, संतोषनगर, शिरोली, वाकी खुर्द, काळूस, शेलगाव, गुळाणी या गावांमध्ये प्रत्येकी दोन जण पॉझिटिव्ह सापडले आहे. आंबोली, आंबेठाण,पाईट, होलेवाडी, राक्षेवाडी, बहुळ, गोळेगाव, कोयाळी, वडगाव घेनंद, वाफगाव या गावात प्रत्येकी तीनजण पॉझिटिव्ह आले आहेत.

रासे, दावडी प्रत्येकी चार पॉझिटिव्ह सापडले आहेत. नाणेकववाडी, वाकी खुर्द, वराळे, भोसे प्रत्येकी पाच व्यक्तीत पॉझिटिव्ह सापडल्या आहेत. निघोजे 7, चिंबळी 8, सवरदरी 10, खराबवाडी 11, मेदनकरवाडी 15, शेलपिंपळ्गाव 15, कुरुळी 21 खालूंब्रे 23, म्हाळुंगे 35 असे ग्रामीण भागातील 58 गावांमध्ये 134 पॉझिटिव्ह सापडले.

तालुक्‍यात आतापर्यंत 16 हजार 542 जण पॉझिटिव्ह झाल्या आहेत. त्यापैकी 14602 व्यक्ती बऱ्या झाल्या आहेत. तर 216 जणांचे मृत्यू झाले आहेत. ग्रामीण भागात 1072, चाकण 377, आळंदी 87, राजगुरूनगर 188, असे एकूण 1724 बाधित रुग्ण आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.