मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर बॉम्ब ठेवण्यात आला असून, घातपाताचा निनावी फोन आल्यानंतर रेल्वे आणि स्थानिक पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली. यानंतर तातडीने घटनास्थळी पोलीस, बॉम्ब स्कॉड आणि श्वान पथक दाखल झाले. CSMT परिसराची कसून तपासणी केल्यानंतर संशयास्पद वस्तू किंवा तसे काही आढळून आले नसल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, निनावी फोननंतर मुंबईतील भायखळा, दादर अशा अनेक रेल्वे स्थानकावर देखील जीआरपी आणि मुंबई पोलिसांची टीम तैनात करण्यात आली होती.या स्थानकांवर येणाऱ्या प्रत्येकाची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत होती. शुक्रवारी रात्री सुमारे 9 वाजताच्या दरम्यान रेल्वे विभागाला निनावी फोन आला होता. ज्याच्यानंतर मुंबई पोलिस, जीआरपी, डॉग स्कॉड आणि बॉम्ब स्कॉडकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं. मुंबई पोलिसांकडून हॉक्स कॉल (निनावी फोन )करणाऱ्या इसमाचा शोध सुरु आहे.
तत्पूर्वीही मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी एका निनावी फोनद्वारे देण्यात आली होती. त्यानंतर मंत्रालयात बॉम्बशोधक पथक दाखल झालं असून कथित बाॅम्बचा तपस सुरु केला यामध्ये काही तरुणांना अटक करण्यात आली होती.