पुण्यात खळबळ: मित्राने अल्पवयीन मुलासोबत स्वच्छतागृहात केले अनैसर्गिक कृत्य; पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

पुणे : पुण्यातील एका घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. एका मित्रानेच  अल्पवयीन मित्रासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दांडेकर पूल परिसरात ही खळबळजनक घटना घडली असून अल्पवयीन मुलाला स्वच्छतागृहात नेऊन शारीरिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

पुण्यात एका तरुणाकडून 16 वर्षीय मित्रावर अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तळजाई पठार येथे राहणारा पीडित 16 वर्षीय अल्पवयीन मुलगा दांडेकर पूल येथील 21 वर्षीय सागर सोनवणे नामक मित्राच्या घरी आला होता. तिथंच ओळखीचा फायदा घेऊन सोनवणेने त्या पीडित मुलाला स्वच्छतागृहात नेलं आणि मारहाण  केली. त्यानंतर त्याच्यासोबत अनैसर्गिक शारीरिक अत्याचार केले.

याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.  दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलाने आपल्यासोबत घडलेला प्रसांगाबाबत कुटुंबियांना माहिती दिली. त्यानंतर कुटुंबियांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभिर्य लक्षात घेत तात्काळ गुन्हा दाखल केला अन् शोधमोहिम हाती घेतली. पोलिसांनी 21 वर्षीय आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. पीडित मुलावर ससूण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.