बारामती । उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अवैध दारु विक्रीवर धडक कारवाई

मोरगाव –  सुपे ता . बारामती  येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अवैध दारु विक्रीवर धडक कारवाई केली. यामध्ये एकूण चार लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून हातभट्टी दारु व दारु बनविण्यासाठी  रसायण  असे एकूण   सत्तावन  हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नाश करण्यात आलेला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाला बारामती तालुक्यातील सुपे येथे अवैध दारू विक्री व हातभट्टी विक्री होत असल्याची माहिती मिळाली . यानंतर  राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक संतोष झगडे , उपाधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विजय मनाळे  , महिला जवान नीलम धुमाळ , विजय विंचुरकर , अशोक पाटील यांनी या अवैध व्यवसायावर धडक कार्यवाही केली .

यामध्ये एकूण चार लोकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पैकी आकाश मच्छिंद्र रायते  रा . सुपा ता बारामती , बटवरा भोलेराज नानावत रा . खोर ;  ता .बारामती  या आरोपीस ताब्यात घेतले आहे . या कार्यवाहीत एकुण सत्तावण हजार ७२५  रुपयांची   २२२ लिटर हातभट्टी  दारु , तर दारु बनविण्यासाठी  १७५० लिटर रसायन ताब्यात घेऊन नष्ट केले आहे .

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.