माण-खटावमधून सर्वाधिक अर्ज
माण- खटाव मतदारसंघातून सर्वाधिक इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले रदेशमुख, संदीप मांडवे, कविता म्हेत्रे, नंदकुमार मोरे, सूर्यकांत राऊत व सुहास पिंगळे यांचा समावेश आहे. त्याचबरोबर फलटण मतदारसंघातून आ. दीपक चव्हाण यांच्याव्यतिरिक्त प्रा. डॉ. अनिल जगताप, अशोक माने, प्रा. शिवकुमार शिंदे यांनी अर्ज दाखल केले आहेत. तसेच कराड दक्षिणमधून ऍड. राजाभाऊ उंडाळकर, अमित पाटील तर पाटणमधून सत्यजीत पाटणकर यांनी अर्ज दाखल केले आहेत.
सातारा – विधानसभा निवडणुकीच्या तयारीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी घेतली आहे. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदारांसह इच्छुकांनी आपले अर्ज राष्ट्रवादी भवनात दाखल केले आहेत. मात्र, विद्यमान आमदारांपैकी साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अद्याप अर्ज दाखल न केल्यामुळे कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या असून साहजिकच सर्वांच्या नजरा गुरूवारी होणाऱ्या मुलाखतीकडे लागून राहिल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यास एक महिन्याचा कालावधी शिल्लक राहिला आहे. साधारण ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांना अर्ज सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार मंगळवारी सायंकाळपर्यंत विद्यमान आमदारांपैकी आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले वगळता पक्षाच्या सर्व आमदारांनी अर्ज सादर केले आहेत.
लोकसभा निवडणुकीदरम्यान आणि त्यानंतरही आ. शिवेंद्रसिंहराजे व खासदार उदयनराजे भोसले यांच्यात कलगीतुरा कायम आहे. त्याचबरोबर आ. शिवेंद्रसिंहराजे भाजपमध्ये जाणार अशा चर्चांनांही उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर शिवेंद्रसिंहराजेंनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी लढविण्यासाठी इच्छुक म्हणून अर्ज सादर न केल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेचे उधाण अधिक रंगणार आहे.
दरम्यान, गुरूवारी दि.25 जुलै रोजी सकाळी दहा वाजता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत. त्या दिवशी आ. शिवेंद्रसिंहराजे मुलाखत देणार का, हेसुध्दा पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.