पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मुसळधार पावसामुळे गुरुवारी (दि.15) होणाऱ्या ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. याचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे.
विद्यापीठामार्फत पदवी व पदव्युतरच्या अंतिम वर्ष विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येत आहे. ती घेत असताना विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी येत आहेत.
त्या दूर करण्यासाठी विद्यापीठाने पाऊल उचलले आहे. परीक्षेतील अडचणी कमी करीत परीक्षा सुरुळीत होत असतानाच आता पावसामुळे होणाऱ्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या.
राज्याच्या विविध भागांसह विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यांतही मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे परीक्षा देताना विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी गुरुवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने घेतला.