अनुत्तीर्णांची परीक्षा 20 नोव्हेंबरला

दहावी, बरावी पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षा येत्या 20 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहेत.

फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये दहावी व बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. यात अनुत्तीर्ण झालेल्या व ए.टी.के.टी.साठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आता पुरवणी परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

दहावीची लेखी परीक्षा 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधी होणार आहे. बारावीच्या सर्वसाधारण व द्विलक्षी विषयासाठी 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत तर व्यवसाय अभ्यासक्रमासाठी 20 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर या कालावधीत परीक्षा होणार आहेत.

दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा या 18 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत होणार आहेत. तसेच बारावीसाठी या परीक्षा 18 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत होणार आहेत. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.