वाघोली – वाघोली तालुका हवेली येथे माजी सैनिक संघटनेच्या वतीने स्वच्छता सप्ताह निमित्ताने ‘स्वच्छता अभियान ‘ राबविण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष अनिल सातव पाटील यांनी दिली आहे.
अनिल सातव पाटील यांनी सांगितले की वाघोली परिसरातील श्री वाघेश्वर मंदिर परिसर, श्रीराम मंदिर, ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर, हनुमान मंदिर, बुद्ध विहार सिद्धार्थ नगर, जामा मज्जिद परिसर, लोणीकंद पोलीस ठाणे परिसरात स्वछता व साफसफाई करण्यात आली. परिसर स्वच्छता व रोगराई पासून मुक्तता व नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी हे ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आल्याचे सातव यांनी सांगितले.
याप्रसंगी आनंद गोसावी, मारुती कुटे, कल्याण लगड, अनिल गायकवाड, आप्पासाहेब पवार, ताम्हणकर साहेब, हवेली तालुका भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अनिल सातव, महादेव काळे, अरुण ननावरे ,शकिर पठाण आदी उपस्थित होते. या उपक्रमासाठी पुणे महानगरपालिकेचे वडगाव शेत्रिय कार्यालयाचे अधिकारी सुहास जगताप व वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने मदत व सहकार्य करण्यात आल्याचे सातव यांनी सांगितले.