संतप्त ग्रामस्थांकडून माजी सरपंच धारेवर

दूषित पाण्याचा टॅंकर मोकळ्या जागेत सोडला : अधिकाऱ्यांचा बेफिकीरपणा

निमसाखर – येथे गेली काही दिवसांपासून शासकीय टॅंकरची मागणी होती. स्थानिक पातळीवरही प्रयत्न सुरू होते. प्रथमच मळीसदृश दूषित पाणी सार्वजनिक विहिरीत सोडण्यास विरोध करीत संतप्त ग्रामस्थांनी टॅंकर परिसरात मोकळ्या जागेत रिकामा करण्यात आला.

सध्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे निमसाखरकरांना पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे. पाटबंधारे खात्याने देखील उन्हाळी हंगामात शेतीला दुजाभाव करत काही मिनिटे तर काही शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळाले नाही. सुरुवातीला खात्याने गावचा तलाव असलेल्या दगडवाडी भागात पाणी सोडले होते. मात्र, गावालगतच्या भागात ग्रामस्थांनी मागणी करून देखील पाणी न सोडले नाही. त्यामुळे पाणीटंचाई आणखी तीव्र झाली. मॉडर्न इंजिनिअरींग भागात ठेवलेल्या टाकी भागात मध्यरात्र असो पहाट बघेल तेव्हा गर्दी पाहावयास मिळत होती. निमसाखरमध्ये बुधवार (दि. 26) टॅंकर विनानंबरचा आला. त्यानंतर संबंधीत कर्मचाऱ्याने लोहार गल्लीत टॅंकर खाली करण्याच्या सूचना दिल्या. टॅंकरजवळ ग्रामस्थ गेले.

त्यावेळी मळीसदृश्‍य दुर्गंधी आल्याने ग्रामस्थांनी थोडा वेळ थांबण्याच्या सूचना केल्या. बादलीत पाणी घेऊन पाहणी केली असता गढूळ, तर दुर्गंधी येत असल्याने काही ग्रामस्थ संतप्त झाले. त्यातील एकाने तर थेट माजी सरपंचांनाच धारेवर धरले. दुर्गंधीयुक्‍त दूषित पाणी देऊन आजार झाले असते तर याला जबाबदार कोण, असा सवाल यावेळी ग्रामस्थांनी केले. दरम्यान, माजी सरपंच गोविंद रणवरे यांनी ग्रामस्थांनी केलेल्या आरोपाचे खंडन करीत टॅंकर कुठला द्यायचा, पाणी कोठून भरायचे, ही बाब प्रशासकीय पातळीवरील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, दोन तासांच्या खलानंतर हे पाणी सार्वजनिक विहिरीत न सोडता अखेर रस्त्यालगतच्या चारीत हा रिकामा करण्यात आला.

गावासाठी तीन टॅंकर मंजूर झाले आहेत. नुकतेच मळीसदृश्‍य दुर्गंधी आणि दूषित पाणी सोडण्याचा आरोप ग्रामस्थांकडून झाला आहे. त्यामुळे ही खेप न धरता संबंधीताना टॅंकर पूर्ण स्वच्छ करून पाणी देण्याची सूचना दिली आहे. वाहनाला नंबर प्लेट लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.
– एस. एन. भिल्लारे, ग्रामवि

Leave A Reply

Your email address will not be published.