सहा महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश
हैद्राबाद: हैद्राबाद एन्काऊंटर प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांमार्फत होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने एन्काऊंटर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांची समिती स्थापना केली आहे. या समितीचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश वी. एस शिरपूरकर असणार आहेत. ही समिती या प्रकरणाचा तपास करुन सहा महिन्याच्या आत आपला अहवाल न्यायालयासमोर सादर करणार आहे.
Supreme Court orders a three member judicial inquiry into #TelanganaEncounter which is to be headed by former SC judge VS Sirpurkar. SC says no other court or authority shall inquire into this matter until further orders of this court. https://t.co/pnCRkqeWfZ
— ANI (@ANI) December 12, 2019
दरम्यान, न्यायालयाचे पुढील आदेश येईपर्यंत अन्य कोणतेही न्यायालय किंवा प्राधिकरण या प्रकरणाची चौकशी करणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. या प्रकरणाचा तपास पुढच्या महिन्याच्या आत पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने या समितीला दिले आहे. हैद्राबाद एन्काऊंटर प्रकरणाची सुनावणी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात झाली यावेळी न्यायालयाने याप्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली.
हैद्राबादमध्ये महिला पशुवैद्यकीय डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करुन तिची जाळून हत्या करणाऱ्या चारही आरोपीचे पोलिसांनी एन्काऊंटर केले. आरोपींनी पोलिसांची बंदूक हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हे चौघेही मारले गेले होते. या प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच एसआयटीमार्फेत देखील याप्रकरणाचा तपास सुरु आहे.