नवी दिल्ली : संसदेवरील हल्ला प्रकरणात अटक झालेल्या मात्र पुराव्या अभावी सर्वोच्च न्यायलयाने मुक्तता केलेले दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक एसएआर गिलानी यांचे गुरूवारी सायंकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली.
ुगलानी यांच्या मागे पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. संसदेवरील हल्ल्यातील आरोपी अफझल गुरू याला फाशी देण्याविरोधात त्यांनी आंदोलन केले होते. त्याबद्दलही त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. संसदेवरील हल्ल्यातील सहभागाच्या आरोपावरून त्यांना अटक करण्यात आली होती. तेंव्हा उच्च न्यायलयाने गुन्हा सिध्द करणारा पुरावा कोठे आहे, अशी विचारणा करत त्यांची सुटका केली होती. त्याला सर्वोच्च न्यायलयात आव्हान देण्यात आले. मात्र सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायलयाचा निकाल कायम ठेवला.
गिलानी यांचे वकील राम जेठमलानी यांनी युक्तीवाद केला होता की, त्यांना पुराव्या अभावी सोडण्यात आले. पण, त्यांचे प्रतिमाहनन आणि त्यांच्या सामाजिक आयुष्य तसेच करीयरचे झालेल्या नुकसानीचे काय? मात्र हा मुद्द सर्वोच्च न्यायलयाने फेटाळून लावला होता.