मुंबई – शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप करीत सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरू झाली आहे. यासाठी शरद पवार पक्षाकडून ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांची वेळ घेणार असल्याची माहिती आहे. सिंघवी यांना भेटून कायदेशीर सल्ला घेतला जाणार असल्याचे समजते. ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढाई देण्याची तयारी विरोधी पक्षांकडून केली जात आहे.
यापूर्वी महाविकास आघाडीने सर्वोच्च न्यायालयात ईव्हीएमविरोधात याचिका दाखल केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे यावेळी महाविकास आघाडी कायदेशीर अभ्यास करून सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. यासाठी ते ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांची वेळ घेणार आहेत. त्यांचा कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर मविआ पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे.