बिहारमधील हॉटेलात सापडली ईव्हीएम मशिन्स 

पाटणा – बिहारमधील  मुझफ्फरपूरमध्ये सोमवारीच पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडले. परंतु आज एका हॉटेलमध्ये ईव्हीएम यंत्रे आणि इलेक्स्ट्रॉनिक यंत्रे सापडली आहेत. यामुळे परिसरात एकाच खळबळ माजली असून विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी हंगामा केला आहे. ही माहिती समजताच उपविभागीय अधिकारी कुंदन कुमार यांनी ईव्हीएमची यंत्रे ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

हॉटेलमध्ये दोन इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे, नियंत्रण युनिट आणि दोन व्हीव्हीपॅट यंत्रे सापडली आहेत. जिल्हाधिकारी आलोक रंजन घोष यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर मतदान केंद्रावरील एखादे यंत्र बंद झाले तर पर्यायी वापरण्यासाठी ही यंत्रे जारी करण्यात आली होती. ती राखीव होती. विभागीय अधिकाऱ्यांना ही यंत्रे देण्यात आली होती. जेणे करून कुठेही यंत्रात बिघाड झाल्याची तक्रार आल्यानंतर ही यंत्रे वापरून मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरू ठेवता येईल. परंतु, ईव्हीएम यंत्रे हॉटेलमध्ये घेऊन जाणे नियमांच्या विरुद्ध असल्याने याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

https://twitter.com/ANI/status/1125606821765345281

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)