कामगारांनाही दाखवले ईव्हीएमचे प्रात्यक्षिक

पिंपरी – मावळ व शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यात म्हणजे दि. 29 एप्रिल रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून औद्योगिकनगरीमधील कामगारांनाही निवडणूक विभागाने ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट मशिनचे प्रात्यक्षिक दाखवून त्यांचे प्रबोधन करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड शहरात अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कामगार काम करीत असतात. त्यामुळे, शहरातील कामगारवर्गच मोठा मतदार आहे. या कामागांरामध्ये मतदानाची जनजागृती व्हावी यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने शहरातील विविध खासगी कंपन्यांमध्ये जाऊन तेथील कामगारांना ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट मशिनचे प्रात्यक्षिक दाखवले जात आहे. तसेच कामगारांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांची उत्तरेही देण्यात येत आहेत.

पिंपरी शहरात टाटा मोटार्स येथे काल मतदानाचे प्रात्यक्षिक कामगारांना दाखवण्यात आले. यावेळी मतदान नोंदणी अधिकारी संदीप खोत, कामगार कल्याण विभागाचे आयुक्‍तपवार यांच्यासह टाटा मोटार्सचे प्रकल्पप्रमुख आलोककुमार सिंग, सरफराज मनेर, रवी कुलकर्णी, सतीश भालचंद्र यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.