इव्हीएममध्ये छेडछाड अशक्‍य – रविशंकर प्रसाद

नवी दिल्ली: इव्हीएम मशीन संदर्भात विरोधकांकडून सातत्याने होत असलेल्या आरोपांना केंद्रिय माहिती आणि प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज पुन्हा उत्तर दिले असून देशात तयार करण्यात येणाऱ्या या इव्हीएम मशिन्स संपुर्णपणे योग्य असून यात कोणत्याही प्रकारची छेडछाड केली जाऊ शकत नाही.

त्याचबरोबर ते पुढे म्हणाले की, भारतात निवडणूकांच्यावेळी वापरण्यात येणाऱ्या इव्हीएम मशिन्स या संपुर्णपणे स्वदेशी बनावटीच्या असून त्या बनविण्यासाठी इतर कोणत्याही देशाच्या सहकार्याने या बनवण्यात येत नाहीत. त्यामुळे यात छेडछाड करणे अशक्‍य आहे.

लोकसभेत बोलताना त्यांनी हे विधान केले. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, भारत इलेक्‍ट्रॉनिक्‍स लिमिटेड आणि इलेक्‍ट्रॉनिक्‍स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या दोन कंपनी या इव्हिएम्स बनवतात. तसेच या कंपनींचे कोणत्याही परदेशी कंपनींशी टाय अप नसल्याने याला परदेशी कंपनींकडून छेडछाड करणे अशक्‍य आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)