कोरोनावरुन लक्ष हटवण्यासाठी चीनच्या भारतीय सीमेवर कुरापती सुरु

तिबेटच्या राष्ट्रपतींचा चीनवर गंभीर आरोप

नवी दिल्ली : कोरोनाचा ज्या देशातून उगम झाला त्या चीनवर सर्व बाजूने टीका होत आहे. त्यात अमेरिकेने तर या प्रकरणात चीनला दोषी ठरवले आहे.त्यात आता भारताची बाजू घेत तिबेटच्या राष्ट्रपतींनी देखील चीनवर गंभीर आरोप केला आहे. कोरोनावरुन लक्ष हटवण्यासाठी चीनच्या भारतीय सीमेवर कुरापती सुरु असल्याचा आरोप तिबेटचे राष्ट्रपती लोबसँग सॅनगे यांनी केला आहे. वुहानमधून पसरलेल्या कोरोनावरुन लक्ष हटवण्यासाठी चीनच्या भारताच्या सीमेवर बैठका सुरु आहेत असा गंभीर आरोप तिबेटच्या राष्ट्रपतींनी केला आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला आहे.

मुलाखती दरम्यान, सेंट्रल तिबेटियन अॅडमिनिस्ट्रेशनचे प्रमुख लोबसँग सॅनगे यांनी चीनवर गंभीर हे आरोप केले आहेत. सॅनगे यांनी म्हटले, अमेरिकेशी बिघडलेल्या आर्थिक संबंधांवरुन चीनमध्ये तणाव आहेत, तिथल्या राज्यकर्त्यांबद्दल प्रचंड नाराजी आहे. त्यावरुन लक्ष हटवण्यासाठी चीन हाँगकाँग आणि भारताच्या सीमेवर उगाच ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

चीनबद्दल जगभरात अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यात युरोप, ऑस्ट्रेलिया, जर्मनीही संशयाने पाहात आहे. 130 देशांनी मिळून कोरोना विषाणूची निर्मिती आणि प्रसार कसा झाला याच्या चौकशीचीही तयारी केली असल्याचे सॅनगे यांनी म्हटले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, गेल्या 60 वर्षापासून चीन हेच करत आहे. आणि त्यांच्या अशा अतिक्रमणाचा फटका सगळ्या शेजारी राष्ट्रांना सहन करावा लागत आहे. 2012 मध्ये सॅनगे यांना तिबेटचे राष्ट्रपती घोषित करण्यात आले. पण चीनच्या अधिपत्यामुळे ते हद्दपार झाले. सध्या ते धरमशालात राहतात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.