Evika Siliņa : लाटव्हियाच्या पंतप्रधान एव्हिका सिलिना यांचा राजीनामा
लाटव्हियाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, मध्य-उजव्या विचारसरणीच्या पंतप्रधान एव्हिका सिलिना (Evika Siliņa) यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा जाहीर केला आहे.

Evika Siliņa : लाटव्हियाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, मध्य-उजव्या विचारसरणीच्या पंतप्रधान एव्हिका सिलिना (Evika Siliņa) यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा जाहीर केला आहे.
सत्ताधारी आघाडीतील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या प्रोग्रेसिव्ह पार्टीने पाठिंबा काढून घेतल्यामुळे सिलिना सरकार अल्पमतात आले होते.या राजकीय भूकंपाचे मूळ गेल्या आठवड्यात घडलेल्या ड्रोनच्या घटनांमध्ये आहे.
लाटव्हियाच्या (Evika Siliņa) हवाई हद्दीत काही युक्रेनियन ड्रोन भरकटत शिरले होते. या संवेदनशील परिस्थितीचा सामना करताना सरकार अपयशी ठरल्याचा आरोप प्रोग्रेसिव्ह पक्षाने केला होता. या वादानंतर संरक्षण मंत्री अँड्रिस स्प्रुड्स यांनाही राजीनामा द्यावा लागला होता.
संरक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतरही सरकारमधील तणाव निवळला नाही. अखेर डाव्या विचारसरणीच्या प्रोग्रेसिव्ह पक्षाने सरकारला दिलेला पाठिंबा अधिकृतपणे काढून घेतला, ज्यामुळे पंतप्रधान सिलिना (Evika Siliņa) यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. युरोपमधील वाढत्या युद्धाच्या सावलीत बाल्टिक देशातील ही अस्थिरता चिंताजनक मानली जात आहे.






