चीनमध्ये सापडले 8000 वर्षांपूर्वीच्या संस्कृतीचे पुरावे

पेइचिंग – चीनमधील पुरातत्व संशोधकांना शिझियांग प्रांतात 8000  वर्षांपूर्वीच्या संस्कृतीचे पुरावे सापडले आहेत. प्रांतातील युआओ नावाच्या शहरात एका कारखान्याची उभारणी सुरु असताना सापडले आहेत.

चीनमधील संस्कृती 8000 वर्षाची जुनी आहे असे आतापर्यंत मानले जात होते. पण या नवीन पुराव्यांमुळे हि संस्कृती किमान 7300 ते 8300 वर्ष जुनी असावी असा नवीन निष्कर्ष आता काढण्यात येत आहे.

पुरातत्व संशोधकांनि दिलेल्या माहितीप्रमाणे, जमिनीच्या खाली 5 ते 10 मीटर खोल 8000 चौरस मीटर क्षेत्रात हि नवीन साईट साईट आहे. या साईटवर उत्खनन सुरु असताना तेथे मातीची भांडी,शस्त्रे, हाडे, लाकडाच्या वस्तू आणि काही प्राण्यांचे अवशेष मिळाले आहेत.

उत्खनन करणाऱ्या गटाचे नेते सुन गुओपिंग यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, या ठिकाणी हि संस्कृती किमान 500 वर्षे अस्तित्वात होती. या उत्खनन मोहोमेमुळे अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील अशी अपेक्षा केली जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.