मुंबई : सचिन वाझे, गृहमंत्री अनिल देशमुखांनी वाझेंना 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे आरोप आणि अँटिलिया या प्रकरणांमुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. यामुळं महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर शहा यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत अमित शहा यांना शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत झालेल्या भेटीबद्दल विचारले असता अमित शहा म्हणाले की, ‘प्रत्येक गोष्ट ही सार्वजनिक करता येत नाही’ अमित शहांनी मोजक्याच शब्दांत उत्तर दिल्यामुळे ही भेट झाली असल्याचा एका प्रकारे दुजोरा मिळत आहे.
तत्पूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे अहमदाबाद येथून एकत्र आले होते. पण, ते कुणालाही भेटले नाही. हे भाजपचे षडयंत्र आहे. ही बातमी निव्वळ अफवा आहे, अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली आहे.
Everything can’t be made public: Union Home Minister Amit Shah on reports of his meeting with NCP leader Sharad Pawar in Ahmedabad pic.twitter.com/NzCqVl3KhQ
— ANI (@ANI) March 28, 2021
शरद पवार, प्रफुल्ल पटेल यांची भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत गुप्त बैठक झाल्याचं वृत्त वृत्त वाहिन्यांनी दिले आहे. या भेटीसाठी पटेल आणि पवार प्रायव्हेट जेटनं शांतिग्राममधल्या गेस्टहाऊसला आले असल्याचा दावा वृत्तात करण्यात आला आहे.