मिल्कशेक तर सगळेच पितात; पण हा खास ‘मँगो मिल्कशेक’ तुम्ही एकदा पिऊनच पाहा…

पुणे – सध्या आंब्याचं सीझन सुरू असून बाजारातही आंब्यांची आवाक् वाढली आहे. आपल्यापैकी कदाचितच कोणी असेल ज्यांना आंबा आवडत नाही. आंबा प्रत्येकाच भूरळ घालतो.

आंब्या मध्ये व्हिटॅमिन आणि फायबर शरीराला उन्हाळ्यात होणाऱ्या समस्यांपासून लढण्यासाठी मदत करतात. आंब्यापासून तयार करण्यात येणार मँगो मिल्कशेकही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो.  

साहित्य – 4 हापूस आंबे, 400 मिली दुध, 8 टेबल स्पून साखर, बर्फाचे क्युब

क्रृती – प्रथम मिक्सर मध्ये साखर बारीक करून घ्यावी, त्यामध्ये आंब्याच्या छोट्या फोडी करून घालाव्यात. थोडे फिरवून घ्यावे त्यामध्ये दुध व बर्फ घालावा मस्त थंडगार मँगो मिल्कशेक तयार

उषा कर्डिले (ओतूर)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.