शिक्षणासाठी रोजच करावी लागतेय

ढेबेवाडी विभागातील डोंगर पठारावरील गावांमधील परिस्थिती
अमोल चव्हाण

ढेबेवाडी – ढेबेवाडी विभागातील अनेक विद्यार्थ्यांच्या नशिबी शिक्षणासाठी रोज पायी प्रवास आजही चालूच आहे. शासनस्तरावर शिक्षणाच्या बाबतीत वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहेत. यामुळे सर्वांना शिक्षणाची चांगली संधी मिळाली आहे. पण ग्रामीण व डोंगर पठारावर असणाऱ्या गावांमधील विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी आजही पायपीट सुरू आहे. दरारोज चार ते पाच किलोमीटर पायी प्रवास करून शाळेला जावे लागते. एसटीची सुविधा नसल्यामुळे अनेकांना अर्ध्यातूनच शिक्षण सोडावे लागते.

ढेबेवाडी विभागातील निवी, कसनी, वरचे घोटील, अंबरूळकरवाडी, सातरा, निगडे, मोडकवाडी मत्रेवाडी, पळशी, पाणेरी आदी वाल्मिक पठारावरील विद्यार्थ्यांना दररोज पाच ते दहा किलोमीटरची पायपीट करून शिक्षणासाठी यावे लागते. तसेच अन्य सपाटीच्या ठिकाणच्या काही गावातील विद्यार्थ्यांची स्थिती त्यापेक्षा वेगळी नाही. बऱ्याच गावात एसटीची सुविधा नसल्याने विध्यार्थ्यांना चालतच निघावे लागते.

काही गावांचा शाळेत जाण्याचा मार्ग ओढे आणि नद्यांतून जात असल्याने पावसाळ्यात विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊनच शाळेला जावे लागते. मुले घरी येईपर्यंत पालकांच्या जिवात जीव राहत नाही. शासनाने पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर योजनेद्वारे पाचवी ते दहावी पर्यंतच्या विध्यार्थ्यांसाठी एसटीने मोफत प्रवास पासची सुविधा केली असली तरीही अनेक गावांनी एसटीचे तोंडचं न पाहिल्याने अनेक मुली या सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांची शिक्षणासाठी पायपीट थांबली नाही. काही भागात रस्त्यांची सोय नसल्याने एसटीची सुविधा उपलब्ध होत नाही. रस्त्याविना विद्यार्थ्यांचा होणारा वनवास थांबणार कधी? असा प्रश्न परिसरातील जनतेतून निर्माण होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)