इंदापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे युवक नेते विकास खिलारे गेल्या वीस वर्षापासून,सलग दर वर्षी रक्तदान करत कोणताही डौल मोल न करता आपला वाढदिवस सामाजिक जाणवेतून साजरा करीत आहेत.तब्बल वीस वर्ष रक्तदान केल्याबद्दल,इंदापूरकरांनी विकास खिलारे यांचा नुकताच इंदापूर येथे विशेष सन्मान केला.
या संदर्भात माहिती देताना युवक नेते विकास खिलारे म्हणाले की, आपला देह हा केवळ आपल्यासाठी नसतो.आपली प्रत्येक सुखदुःखाची गोष्ट, जर आपण सामाजिक जाणवेतून मनापासून जोडली तर,मनाला वेदना कमी होतात आणि आनंद जास्त होतो. ही भावना सातत्याने मनात असून,इंदापूर शहरात तसेच तालुक्यात जेथे आपणास सार्वजनिक काम असेल कार्य असेल ते करायला आवडते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षअध्यक्ष शरद पवार यांच्या विचाराने प्रेरित होऊन,सामाजिक काम करताना वेगळी ऊर्जा मिळते.अशीही माहिती विकास खिलारे यांनी दिली. पुणे जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने,तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील व इंदापूर शहरातील मुक्ताई ब्लड सेंटरचे पदाधिकारी यांनी विकास खिलारे यांचा विशेष सन्मान इंदापूर येथे केला.यावेळी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.