बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना असे वाटते की, संपूर्ण जगाला खूश करण्याची काहीही गरज नाही; परंतु काही जणांना असे कमी वयातही वाटू शकते. दिग्गज अभिनेत्याने शनिवारी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक कोलाज फोटो शेअर केला आहे. यात ते आरशात आपला चेहरा बारकाईने पाहताना दिसत आहेत.
बिग बीने लिहिले की, दररोज सकाळी आपल्याला फक्त एकाच व्यक्तीला सामोरे जावे लागते. ती व्यक्ती म्हणजे आपण स्वत:. जेव्हा आपण तरुण असतो, तेव्हा आपण संपूर्ण जगाला खूश करावे असे वाटते; परंतु हे चूक आहे. आपल्याला ज्यातून आनंद भेटतो तेच आपण केले पाहिजे. आपण असे केल्यास तुम्हाला दररोज सकाळी प्रेम करणारी व्यक्ती भेटेल.
अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगवरही हे फोटो शेअर केले आहेत. जे त्यांनी आपल्या “कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर क्लिक करण्यात आले होते. दरम्यान, सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांचे हे फोटो खूपच व्हायरल झाले आहेत. या फोटोंना असंख्य लाइकस् मिळत असून त्यावर
अनेक जणांनी कमेंटही केल्या आहेत.