अखेर पिंपरी रस्त्याचे बंद पडलेले काम मार्गी

आमदार दत्तात्रेय भरणे यांचे प्रयत्न सार्थकी

नीरा नरसिंहपूर- पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर) येथून राज्य मार्गालगत जोडणारा ओझरे ते पिंपरी रस्ता बंद पडलेला होता. हा रस्ता सुरू करण्यासाठी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. वीस दिवसांपूर्वी नुकतीच ओझरे येथील कार्यक्रमासाठी आमदार भरणे आले होते. त्यावेळी त्यांना बंद पडलेल्या रस्त्याचे काम कधी सुरू होणार, असे विचारले होते. त्यानंतर भरणे यांनी एक महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे आश्‍वासन नागरिकांना दिले होते.

त्यानंतर भरणे यांनी या रखडलेल्या कामाचा पाठपुरावा केला. त्यामुळे हे काम पुन्हा आठ ते दहा दिवसांपूर्वी सुरू झाले आहे. शेवटचा टप्पा पूर्ण होऊन काम लवकरच मार्गी होईल, असे साईकृष्ण कन्ट्रक्‍शनचे मॅनेजर गणेश बंदीछोडे यांनी सांगितले. पिंपरी बुद्रुकचे माजी सरपंच श्रीकांत बोडके पाटील, टण्णूचे माजी सरपंच सोमनाथ मोहिते पाटील, माजी सरपंच श्रीकांत दंडवते, टण्णूचे सरपंच अशोक बळते, आदींनी समाधान व्यक्‍त केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)