हंगाम संपला तरीही पावसाचे धूमशान

सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा दुप्पटीहून अधिक पाऊस कोसळला

पुणे – पुणे शहरात यंदा पावसाचे निरनिराळे विक्रम पाहायला मिळत आहेत. या विक्रमांमध्ये आणखी एक भर पडली आहे. ती म्हणजे पावसाचा अधिकृत हंगाम संपल्यानंतरही दोनशे मिलीमीटर पाऊस शहरात पडला आहे.

यंदाचा पाऊस हा विक्रमीच ठरला आहे. सर्वप्रथम पावसाचे पुण्यात आगमन जूनच्या अखेरीस झाले ऐवढ्या उशिराने पावसाने आगमन होणे हा सुद्धा एक विक्रम होता. त्यानंतर जुलै मध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळला. तीच स्थिती ऑगस्टमध्ये सुद्धा सरासरी पडणाऱ्या पावसाचा विक्रम मोडित काढला.

सप्टेंबरमध्ये तर सरासरीपेक्षा दुप्पटीहून अधिक पाऊस कोसळला सप्टेंबर अखेरपर्यंत शहरात तब्बल 816 मिलीमीटर पाऊस पडला होता. हा सरासरीच्या तुलनेत तब्बल 355 मिलीमीटरने अधिक आहे. याशिवाय आणखी एक विक्रम म्हणजे कमी वेळात जास्तीत जास्त पाऊस पडण्याचा सुद्धा यंदाच्या मोसमात झाला आहे. काही तासांत शहरात 135 ते 140 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याचबरोबर 1,000 मिलीमीटरहून अधिक पावसाची सुद्धा नोंद झाली आहे.

30 सप्टेंबरला तांत्रिकदृष्ट्या चार महिन्यांचा हंगाम संपला असताना 1100 मिलिमीटरहून अधिक आणि सरासरीच्या दुप्पट पावसाची नोंद झाली.

शहरावर पावसाचे सावट कायम
शहरात पुन्हा पावसाला सुरुवात झाली. मागील पाच ते सहा दिवसांपासून दररोज पाऊस हजेरी लावत आहे. या महिन्यात आजपर्यंत 200 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शहरावर अजूनही पावसाचे सावट आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर होत असलेल्या पावसाने आता मात्र नागरिकांना हैराण केले आहे. पावसाच्या या विक्रमांपेक्षा आता त्याचा वैताग नागरिकांना जास्त सतावू लागला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)