नवी दिल्ली – अदानी समूहाच्या हिंडेनबर्गच्या अहवालावरून संसदेत आजही जोरदार गदारोळ झाला. विरोधकांनी आक्रमक भूमिका मांडत अदाणींबाबत अनेक सवाल उपस्थित केले. विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेचे कामकाज सलग तिसऱ्या दिवशीही ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सुरू झाले, मात्र दोन्ही सभागृहात कोणतेही कामकाज होऊ शकलेले नव्हते. मंगळवारीही लोकसभेत विरोधी पक्षांनी मोठा गोंधळ घातल्याचे पाहायला मिळाले.
लोकसभेप्रमाणे राज्यसभेतही काहीसे असेच चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे लोकसभेसह राज्यसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते.
Lok Sabha adjourned till 12 noon over Opposition MPs’ demand for a discussion on #Adani row and demand for a JPC. pic.twitter.com/2QWzs8ruqh
— ANI (@ANI) February 7, 2023
आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत. अदानी प्रकरणाची जेपीसी किंवा सरन्यायाधीशांच्या देखरेख समितीकडून चौकशी करावी अशी मागणी खरेगेंनी लावून धरली. काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी अदानी प्रकरणावर सविस्तर चर्चेसाठी लोकसभेत स्थगन प्रस्तावाची सूचना दिली आहे.संसदेच्या कामकाजातील आजचा दिवस चांगलाच वादळी ठरला.
संसदेबाहेरही विरोधक आक्रमक
विरोधी पक्ष अदानी प्रकरणाची जेपीसी चौकशी करण्याची मागणी करत आहे. संसदेच्या आतच नव्हे तर बाहेरही निदर्शने होत असल्याचे यावेळी पाहायला मिळाले. काँग्रेसने सोमवारी अदानी समूहाला कर्ज देणाऱ्या एलआयसी आणि एसबीआयच्या कार्यालयासमोर देशभरात निदर्शने करून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मंगळवारी देखील सभागृहात याचे पडसाद पाहायला मिळाले.