महाराष्ट्रात सुध्दा जनतेच्या “घड्याळाचे” काय सांगावे टायमिंग…?

पाटणा – बिहार विधानसभेच्या अटीतटीच्या निवडणुकीत अखेर एनडीएला अखेर बहुमत मिळाले आहे. यासह बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार सातव्यांदा शपथ घेतील. सत्तारूढ एनडीए आणि विरोधकांच्या महाआघाडीत सत्ता काबीज करण्यासाठी कॉंटे की टक्कर पहावयास मिळाली. 

एनडीएने थोड्या जागांच्या फरकाने विरोधकांच्या महाआघाडीला मागे टाकत बहुमताचा आकडा पार केला. सर्व २४३ जागांच्या निकालानुसार, एनडीएने १२५ जागा मिळवल्या आहेत. यामध्ये ७४ जागा भाजपाने, ४३ जागा जदयूने तर मित्र पक्षांनी ८ जागांवर विजय मिळवला आहे.

या विजयानंतर भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.

 


आशिष शेलार ट्विट

“काँग्रेसने महाराष्ट्राआशिष शेलारत ‘हातात’ ‘धनुष्यबाण’ धरला, त्याचा ठासून फटका बिहारमध्ये बसला. आता महाराष्ट्रातदेखील जनतेच्या ‘घड्याळाचे’ काय सांगावे टायमिंग…? पंचायत ते पार्लमेंट मॅन ऑफ द मॅच पंतप्रधान नरेंद्र मोदीच! त्यांच्यासह नितीश कुमारजी, देवेंद्रजीं फडणवीस यांचे अभिनंदन,” असं म्हणत शेलार यांनी विरोधकांवर निशाणा साधला. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.