मुंबई – मित्रांसोबत पार्टी सेलिब्रेशन असो या फिरण्याची गोष्ट असो, मलायका आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद कसा घेता येईल हे तिला माहिती आहे.
मलायकाच्या इंस्टाग्रामवर ती नेहमीच आपल्या लाईफ चे अप अँड डाऊन अपडेट इंस्टाग्रामवर शेअर करीत असते.
“छैयां छैयां’ गर्ल मलायकाने तिच्या नवा फोटोशूटचा व्हिडीओ शेअर केला आहे. तिने शेअर केलेले हे व्हिडीओशूट सध्या खुपच व्हायरल होत आहे.
मलायकाच्या या फोटोला आतापर्यत तब्बल लाखोंच्या घरात चाहत्यांनी लाईक केले आहे.
या फोटोत मलायका खूपच ‘हॉट’ अशी दिसत आहे. मलायकाने वेस्टन कपडे परिधान केली आहे. हा फोटोशूट केळीच्या झाडामध्ये केला असून या फोटोवर चाहत्यांनी अनेक हार्ट इमोजी पोस्ट करत तिची स्तुती केली आहे.
तर दुसऱ्या फोटोमध्ये मलायकाने बिकनी घातली आहे या फोटोत ती खूपच स्टायलीश आणि तिचा अंदाज एकदम हटके असल्याचा दिसून येत आहे. मलायकाचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडत आहे.