Navneet Rana : एमआयएम पक्षाच्या मुंब्रा येथील नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. यानंतर पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील फक्त मुंब्राच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा होईल, असे वक्तव करून वादात आणखी भर घातल्याने वाद आणखी चिघळला आहे. सहर शेखर यांच्या वादग्रस्त विधानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली. त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. यासंदर्भात जलील यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. या पत्रकार परिषदेमधून जलील यांनी भाजपवर सडकून टीका करत भाजपच्या काही नेत्यांना लक्ष केले. भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांच्यावर इम्तियाज जलील यांनी टीका केली. या टीकेला नवनीत राणा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “तुमच्या सात पिढ्या आल्या तरी त्या महाराष्ट्राला हिरवा करू शकणार नाहीत,” अशा आक्रमक शब्दांत नवनीत राणा यांनी जलील यांना प्रत्युत्तर दिले आहे. हेही वाचा : Pune News : प्रभागाचा विकास करून मतदारांचा विश्वास सार्थ ठरवू; नगरसेविका सारिका घुलेंचे आश्वासन नवनीत राणा यांनी जलील यांनी केलेल्या विधानाचा निषेध नोंदवला. “आम्ही तुम्हाला या देशात अल्पसंख्याक म्हणून राहू दिले याचा अर्थ असा नाही की आम्ही गप्प बसू. गरज पडल्यास आम्हाला प्रत्युत्तर देण्यासाठी १५ सेकंदही पुरेसे आहेत, असा इशारा नवनीत राणांनी जलील यांना दिला. नवनीत राणांनी राजकारण सोडून पुन्हा चित्रपटसृष्टीत जावे, असे विधान इम्तियाज जलील यांनी केले होते. तसेच भाजपची हिंदू-मुस्लिम विभाजनाची राजकीय रणनीती असल्याचे देखील ते म्हणाले होते. माजी खासदार इम्तियाज जलील पुढे बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, “हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आमच्या शरीरात आजही छत्रपतींच्या पुत्रांचे आणि भक्तांचे रक्त वाहते. हा महाराष्ट्र कधीही हिरवा होणार नाही.” असा शब्दांत त्यांनी ठणकावून सांगितले. तसेच नवनीत राणा यांनी पत्रकार परिषदेत इम्तियाज जलील यांनी महिलांबद्दल वापरलेल्या भाषेवर तीव्र आक्षेप नोंदवला. महिलांबद्दल अपमानास्पद शब्द वापरणे थांबवले नाही, तर तुम्हाला महाराष्ट्रात फिरणे कठीण होईल, असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे. हेही वाचा :US-Greenland Tensions : ट्रम्पची नजर ग्रीनलँडवर ! व्हाईट हाऊसकडून पेंग्विनचा AI फोटो शेअर ; जाणून घ्या नेमकं प्रकरण