मुंबई – अभिनेत्री ‘कश्मीरा शाह’ हे बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या बोल्ड आणि दिलखेच अदांनी फॅन्सला वेळोवेळी घायाळ करत आलेली कश्मीरा सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असते. ती सतत आपले बोल्ड अँड हॉट फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते.
View this post on Instagram
कश्मीराने बॉलिवूडमध्ये काही मोजकेच चित्रपट केले आहेत. तरी देखील चित्रपटसृष्टीत तिची एक वेळीच ओळख आहे. ती म्हणजे तिच्या बॉडी ट्रांस्फॉर्मेशनमुळे. कश्मीराचा पती अभिनेता कृष्णा अभिषेकने हे फोटो स्वत: सोशल मीडियावर शेअर केले होते.
View this post on Instagram
सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणाऱ्या कश्मीराने २०१३ मध्ये अभिनेता कृष्णा बरोबर लग्न केले. पप्पू पास हो गया या चित्रपटाच्या सेटवर कश्मीरा आणि कृष्णाची ओळख झाली होती. कश्मीराचे हे दुसरे लग्न आहे.
View this post on Instagram
दरम्यान, लग्नानंतर कश्मीराने आई होण्यासाठी १-२ वेळा नाही तर तब्बल १४ वेळा प्रयत्न केला होता. पण प्रत्येक वेळी तिच्या पदरात निराशा पडत होती. त्यानंतर बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने त्यांना एक मोलाचा सल्ला दिला आणि त्यांना एक नाहीतर, दोन मुले आहेत.
View this post on Instagram
‘मी १४ वेळा प्रयत्न करुनही आई होऊ शकले नव्हते. या सर्वामुळे मी खूप डिप्रेस झाले होते. त्यानंतर मी आणि अभिषेकने आयव्हीएफ तंत्रज्ञानाची मदत घेण्याचा निर्णय घेतला होता. तरीही आम्हाला यश आले नाही’ असे कश्मीराने एक मुलाखतीत सांगितले आहे.
View this post on Instagram
पुढे ती म्हणाली, ‘सलमानला ही गोष्ट कळाली तेव्हा त्याने आम्हाला सरोगसीचा सल्ला दिला आणि आम्हाला ते पटले देखील. २०१७मध्ये आम्हाला जुळ्याची मुले झाली. सलमानने आमच्यासाठी जे काही केले त्यासाठी आम्ही कायम त्याचे ऋणी राहू.’ असं ती म्हणते.
View this post on Instagram