मुंबई: राणे परिवार आणि शिवसेना यांच्यातील वाद उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. नारायण राणे यांचे दोन्ही पुत्र शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. यांच्याकडून काहीदिवसांपूर्वी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर देखील टीका करण्यात आली होती.
दरम्यान, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी राणे यांना सुनावले आहे. निवडणुकांमध्ये पराभव पदरी पडल्यानंतरही, नारायण राणे आणि त्यांचा मुलगा त्यातून बोध घेत नाहीत. आजही ते पूर्वीसारखंच बोलत आहेत. त्यामुळे यावेळीही जनताच त्यांना त्यांची जागा दाखवेल, असे केसरकर म्हणाले.
शिवसेना भाजपची युती झाल्यापासून राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. राणे यांनी ही युती मातोश्रीच्या स्वार्थासाठी झाली असल्याचे म्हटले होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद तीव्र होण्याची शक्यता आहे.