नवी दिल्ली – भारतीय कुस्ती महासंघाकडे माफीनामा सादर केल्यानंतरही भारताची अव्वल महिला कुस्तीपटू विनेश फोगटसमोरच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. महासंघाने तिचा माफीनामा मिळाल्याचे सांगितले असले तरीही तिला आगामी जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सहभाग घेता येणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये विनेशला अपयश आले होते तसेच तिच्या वर्तनावरही सातत्याने टीका होत होती.
महासंघाने स्पर्धा संपल्यावर या गोष्टीची गंभीर दखल घेत तिला निलंबित केले होते व “कारणे दाखवा’ नोटीसही बजावली होती. विनेशने महासंघालाच आव्हान देण्याचे सूतोवाच केले होते. मात्र, अचानक युटर्न घेत तिने महासंघाकडे माफीनामा सादर केला होता.