मुंबई – शाहरुख खान सोशल मीडियावर सक्रिय असला तरी तो चित्रपटांच्या अपडेट व्यतिरिक्त फार कमी वेळा इतर पोस्ट टाकत असतो. म्हणूनच शाहरुखने नुकत्याच पोस्ट केलेल्या त्याच्या शर्टलेस फोटोची चांगलीच चर्चा सुरु आहे. शाहरुखचा हा लूक त्याच्या आगामी पठाण चित्रपटातील असल्याचे बोलले जात आहे.
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘पठाण’मध्ये दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही भूमिका आहेत. ‘पठाण’ हा शाहरुख खानच्या तीन बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे, इतर दोन ‘जवान’ आणि ‘डंकी’ आहेत. शाहरुख शेवटचा 2018 मध्ये आलेल्या ‘झिरो’ चित्रपटात दिसला होता. याचे शूटिंग भारत, स्पेन आणि इतरत्र झाले आहे. चाहत्यांनी मात्र या शाहरुखच्या व्हायरल फोटोवर चांगल्याच कमेंट केल्यात. काहींनी त्याला शर्ट हरवलाय का ? असं विचारलय तर काहींनी या वयात आराम करण्याचा सल्ला त्याला दिला आहे.
View this post on Instagram
‘ओम शांती ओम’ आणि ‘चेन्नई एक्स्प्रेस’ सारख्या यशस्वी चित्रपटानंतर शाहरुख आणि दीपिका ही हिट जोडी पुन्हा पडद्यावर येणार आहे. ‘पठाण’ पुढील वर्षी २५ जानेवारीला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. शाहरुख रॉ एजंटच्या भूमिकेत आहे, तर जॉन अब्राहम एक मजबूत खलनायकाच्या भूमिकेत आहे. वयाच्या पन्नाशी नंतर देखील शाहरुखने बॉडी मेंटेन ठेऊन दाखवलेले ऍब्स चाहत्यांना चांगलेच भुरळ घालत आहेत.