सिनेसृष्टीत हरेक प्रकारची माणसं पाहायला मिळतात. इथं दोस्तीचे जसे नमुने आढळतात तसेच प्रतिस्पर्ध्यावर मात करणाऱ्यांसाठी गिमिक्स करणाऱ्यांचेही. पण बिटाऊनमध्ये सध्या चर्चा सुरू आहे ती करण आणि दिनेशच्या दोस्तीची !
View this post on Instagram
Shaadi nights #anissamaangayi styled by @nikitajaisinghani ? @rahuljhangiani in @sabyasachiofficial
तसे पाहता बॉलीवूडमध्ये प्रतिस्पर्धी निर्मात्याचा एखादा चित्रपट प्रदर्शित होणार असेल तर तिकीटबारीवर त्याच्याशी मुकाबला नको म्हणून अनेक निर्माते आपल्या सिनेमाची प्रदर्शनाची तारीख बदलत असतात.
पण दोन निर्मात्यांनी परस्पर सहमतीने आपल्या चित्रपटांच्या रिलीज डेटस् बदलल्याची मोजकी उदाहरणे आहेत. यामध्ये करण जोहर आणि दिनेश विजनचा उल्लेख करावा लागेल. याचे कारण या दोघांनी अंग्रेजी मीडियम, गुंजन सक्सेना आणि रुही अफ्जा या तीन चित्रपटांच्या रिलीज डेटस् बदलल्या आहेत.
View this post on Instagram
Headed to the International Emmys #iemmys in @dolcegabbana Styled by @nikitajaisinghani !!!
दिनेश विजनचा अंग्रेजी मीडियम हा चित्रपट आता एक आठवडा आधी म्हणजे 13 मार्च 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे. वास्तविक या दिवशी करण जोहरचा गुंजन सक्सेना हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. पण तो आता दिनेश व्हिजनच्या “रुही अफ्जा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेला म्हणजेच 24 एप्रिल 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे.
निर्मात्यांनी आपापसांत चर्चेने हा तोडग्याचा मार्ग काढला असला तरी त्यामुळे तिकीटबारीवर तुल्यबळ, बिगबजेट चित्रपटांचा सामना आता पाहता येणार नाही. अर्थात, अलीकडील काळात हे सर्रास घडताना दिसत आहे. त्यामुळेच कदाचित प्रदर्शित झाल्याच्या पहिल्याच दिवशी अनेकांचे चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये दाखल होताना दिसतात.
View this post on Instagram
Diwali celebrations begins! In @anamikakhanna.in styled by @nikitajaisinghani ? @kadamajay