हॉलीवूड अभिनेत्री ईवा मेंडेसने लवकरच अभिनय क्षेत्रात पुनरागमन करणार असल्याचे संकेत दिले आहेत. ईवाने आपल्या मुलांच्या संगोपनासाठी तब्बल 6 वर्षांपासून ब्रेक घेतला आहे. एका मुलाखतीत ती म्हणाली की, कदाचित मी पुन्हा अभिनय करण्यास तयार होउ शकते.
46 वर्षीय अभिनेत्री ईवाला जेव्हा तिच्या प्राथमिकतांबद्दल विचारले गेले तेव्हा ती म्हणाली, अभिनयाकडे परत जाण्याची माझी महत्त्वाकांक्षा आहे. मला वाटत की ही माझी महत्त्वाकांक्षा अद्याप संपलेली नाही, ती फक्त मुलांकडे वळली आहे.”
दोन मुलांची आई असलेली ईवा म्हणाली, मी त्या महिलांचे कौतुक करते, ज्या हे सर्व करु शकतात. परंतु मी त्यापैकी नाही. मी कृतज्ञतापूर्वक सांगू इच्छिते की, माझ्याकडे काम न करण्याचा पर्याय आहे. माझी मुले आता 4 वर्षे आणि 6 वर्षांची आहेत. आता मला वाटते की माझ्या अभिनयाची महत्त्वाकांक्षा परत येत आहे.
दरम्यान, ईवा मेंडेस आणि तिचा पती, अभिनेता रयास गोसलिंग यांची भेट 2011मध्ये “द प्लेस बियॉंड द पाइंस’च्या सेटवर झाली होती. यानंतर ही जोडी विवाहबंधनात अडकली होती.