स्पेनमध्ये इच्छामरणाला मान्यता…

विधेयकाला देशाच्या संसदेत मंजुरी

माद्रिद – स्पेनमध्ये अखेर इच्छामरणाला मान्यता देण्यात आली असून याबाबतच्या विधेयकाला देशाच्या संसदेत मंजुरी देण्यात आली दीर्घकाळ आजारी असलेले रुग्ण किंवा सहन न होणारी व्याधी असणारे रुग्ण आता डॉक्तरांच्या सहकार्याने आपले जीवन संपवू शकतील.

संसदेत या विधेयकाच्या बाजूने १९८ आणि विरोधात १३८ मते मिळाली अर्थात स्पेनच्या वरिष्ठ सभागृहाची मान्यता गरजेची आहे या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यानंतर तो कायदा सरकारी गॅझेटमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर ३ महिन्यांनी या कायद्याची अंमलबजावणी सुरु होणार आहे.

स्पेनचे आरोग्यमंत्री साल्वाडोर आला यांनी या कायद्याचे समर्थन करताना सांगितले समाजाचा म्हणून आपण अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांचे हाल पाहू शकत नाही म्हणूनच आम्ही हा कायदा केला आहे आता डॉक्तरांच्या सहकार्याने आणि सल्ल्याने रुग्ण आपले जीवन संपवू शकतील आणि त्यांची वेदनेतून मुक्ती होईल.

यापूर्वी पोर्तुगालने असाच कायदा केला आहे; तर बेल्जियम कॅनडा कोलंबिया लक्सेम्बर्ग नेदर्लंड्स या देशातही इच्छामरणाला कायदेशीर मान्यता आहे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.