युरोपीय महासंघाची “ब्रेग्झिट’ला सहमती

लंडन : युरोपीय महासंघातून ब्रिटनने 31 ऑक्‍टोबरच्या मुदतीत बाहेर पडण्यासाठी नव्या ब्रेग्झिट करारावर आपली सहमती झाली असल्याचे ब्रिटन आणि युरोपीय महासंघाने जाहीर केले.

पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी या कराराचे उत्कृष्ट करार म्हणून स्वागत केले; तर युरोपीय महासंघाचे अध्यक्ष जीन-क्‍लॉड जंकर यांनी हा “वाजवी आणि संतुलित करार’ असल्याचे सांगत संघटनेच्या सध्या ब्रसेल्समध्ये सुरू असलेल्या परिषदेत सदस्य देशांनी त्याला मंजुरी द्यावी, अशी शिफारस केली.

तथापि, या कराराला मंजुरी मिळण्यासाठी जॉन्सन यांना संसदेत आवश्‍यक बहुमत मिळते की नाही हे अद्याप कळायचे असल्याने नव्या कराराचे भवितव्य अधांतरी आहे. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये जॉन्सन यांच्या हुजूर पक्षाला पाठिंबा देणाऱ्या नॉर्दर्न आयरिश डेमॉक्रॅटिक युनियनिस्ट पार्टीने (डीयूपी) जॉन्सन यांच्याविरुद्ध उघड बंड केले आहे.

आम्हाला परिस्थितीवर पुन्हा नियंत्रण मिळवणारा नवा करार मिळाला आहे, असे ट्‌वीट जॉन्सन यांनी केले. त्यानंतर ब्रसेल्समध्ये जंकर यांच्या सोबतीने पत्रकारांना संबोधित करताना त्यांनी ब्रिटिश खासदारांना एकत्र येऊन आपल्या या “अत्युत्कृष्ट’ कराराला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)