द हेग – नेदरलॅन्डच्या पूर्व किनाऱ्यावर आलेल्या वादळामुळे दोन तेलवाहू जहाजांची धडक झाली आहे. यातील एक जहाज समुद्रामध्ये बुडायला लागले आहे. त्यामुळे या जहाजावरील कर्मचारी आणि माल तातडीने हलवायला सुरुवात झाली आहे.
18 कर्मचारी असलेल्या ज्युलिएट डी या माल्टाच्यू जहाजाची धडक दुसऱ्या एका बोटीला बसली आहे, असे रॉयल डच लाईफबोट कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले. ही धडक इजमुइदेन बंदरापासून पश्चिमेला 20 किलोमीटर अंतरावर घडली. या धडकेनंतर दुसरया बोटीचेही नुकसान झाले. मात्र नंतर ही बोट आपला प्रवास पुढे सुरू टेवू शकली, असेही या प्रवक्त्याने सांगितले.
या धडकेमुळे ज्युलिएट डी जहाजाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला. किनाऱ्यावरून मदत आणि बचावासाठी एक हेलिकॉप्टर घटनास्थळी रवाना झाले आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे दुसरीकडे हलवण्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे.