UEFA Euro Cup 2024 Quarter Finals schedule : यूएफा UEFA युरो चषक 2024 हळुहळू त्याच्या समारोपाला जात आहे. बाद फेरीला सुरुवात झाली आहे. राउंड ऑफ-16 च्या फेरीनंतर आता 5 जुलैपासून उपांत्यपूर्व फेरीला सुरुवात होणार आहे. काही मोठ्या संघांना राउंड ऑफ-16 च्या फेरीतूनच बाहेर पडावे लागले. यासंघांमध्ये गतविजेता इटलीचाही समावेश आहे.
या स्पर्धेची सुरूवात 24 संघांनी झाली होती आता फक्त आठ संघ शिल्लक आहेत. युरो 2024 चे पाच आवडते संघ – फ्रान्स, इंग्लंड, पोर्तुगाल, स्पेन आणि यजमान जर्मनी अजूनही शर्यतीत आहेत. नेदरलँड्स, स्वित्झर्लंड आणि तुर्कीनेही अंतिम-8 मध्ये स्थान मिळवले आहे. फ्रान्स, पोर्तुगाल, स्पेन आणि जर्मनी या चारपैकी कोणतेही दोनच संघ उपांत्यपूर्व फेरीतून उपांत्य फेरीत आगेकूच करतील .
उपांत्यपूर्व फेरीत स्पेनचा सामना जर्मनीशी तर पोर्तुगालचा सामना 5 जुलैला फ्रान्सशी होणार आहे. या सामन्यातील दोन विजयी संघ उपांत्य फेरीत आमने-सामने येतील. युरो 2020 मध्ये पोर्तुगाल आणि फ्रान्सने 2-2 अशी बरोबरी साधली होती, परंतु आतापर्यंत त्यांचे स्टार फुटबॉलपटू काही खास खेळ दाखवू शकलेले नाहीत. क्रिस्टियानो रोनाल्डो आणि किलियन एमबाप्पे यांनीही अद्याप स्पर्धेत साजेशी अशी कामगिरी केलेली नाही.
T20 World Cup 2024 : टीम इंडिया मायदेशात परतल्यानंतर काय-काय झालं? पहा, सर्व फोटो एका क्लिकवर…
स्वित्झर्लंडने जायंट किलर असल्याचे सिद्ध केले आहे. जर्मनीला जवळजवळ हरवल्यानंतर, त्यांनी गतविजेत्या इटलीला राऊंड ऑफ 16 मध्ये सहज पराभूत करून स्पर्धेतून बाहेर केले. आता त्याचा सामना इंग्लंडशी होणार आहे. या स्पर्धेत इंग्लंडचा संघ आतापर्यंत ज्युड बेलिंगहॅमवर अवलंबून आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या शेवटच्या सामन्यात नेदरलँड्सचा सामना तुर्कीशी होणार आहे. तत्पूर्वी तुर्कीने बलाढ्य ऑस्ट्रियाचा पराभव तर नेदरलँड्सने रोमानियाचा 3-0 असा पराभव केला आहे.
उपांत्य फेरीत स्पेन vs जर्मनी यांच्यातील विजेत्याचा सामना पोर्तुगाल-फ्रान्स यांच्याील विजेत्याशी होईल, तर दुसरीकडे इंग्लंड-स्वित्झर्लंड यांच्यातील विजेत्याचा सामना नेदरलँड-तुर्की यांच्यातील विजेत्याशी होईल.
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक…
1. स्पेन विरुद्ध जर्मनी : 5 जुलै, रात्री 9.30 वा. (ठिकाण – एरिना, स्टटगार्ट)
2. पोर्तुगाल विरुद्ध फ्रान्स : 6 जुलै, दुपारी 12:30 वा. (ठिकाण- फॉक्सपार्कस्टॅडियन, हॅम्बर्ग)
3. इंग्लंड विरुद्ध स्वित्झर्लंड : 6 जुलै, रात्री 9:30 वा. (ठिकाण -मेर्कुर स्पील-अरेना, डसेलडॉर्फ )
4. नेदरलँड विरुद्ध तुर्की : 7 जुलै, दुपारी 12:30 वा. (ठिकाण -ऑलिम्पियास्टॅडियन, बर्लिन)