लंडन – चीनसह जगभरात पसरलेल्या करोना विषाणूंच्या धोक्यामुळे यंदाची युरो करंडक फुटबॉल स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. ही स्पर्धा जागतिक फुटबॉल क्षेत्रात अत्यंत मानाची समजली जाते. पुढील वर्षी म्हणजेच 2021 मध्ये ही स्पर्धा घेण्याचे आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने जाहीर केले आहे.
कोरोना विषाणूंचा प्रसार जगभरात अत्यंत वेगाने होत आहे, अशा स्थितीत खेळाडूंचे तसेच चाहत्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते यामुळे ही स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
तसेच स्पेनचा युवा फुटबॉल प्रशिक्षक फ्रान्सिस्को गार्सिया याचा करोनामुळे मंगळवारी मृत्यूही झाला असून हा क्रीडा क्षेत्रातील करोनाचा पहिला बळी घला आहे आणि हाच अखेरचा बळीही ठरावा अशी अपेक्षा करत युरोपीय फुटबॉल महासंघाने ही स्पर्धा यंदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.