शाळांना “युडायस प्लस’वर माहिती अपडेटचा विसर

राज्यातील 1 हजार 22 शाळांना वारंवार सूचना देवूनही कार्यवाही नाही

पुणे – केंद्र शासनाच्या “युडायस प्लस’ प्रणालीवर राज्यातील 1 हजार 22 शाळांनी वारंवार सूचना देवूनही विद्यार्थी, शिक्षक यांच्या बाबतची माहिती अपडेट केलेली नाही.

शिक्षण विभागासाठी विविध योजना राबविताना शासनाकडून अनुदान वाटप करण्यात येते. योजना राबविणे, अनुदान वाटप करणे याचे नियोजन व्यवस्थित करता यावे यासाठी शाळांची सविस्तर माहिती एकत्रित उपलब्ध व्हावी यासाठी “युडायस प्लस’ प्रणाली विकसित केली आहे. यावर अचून माहिती नोंदविण्याचे आदेश बऱ्याचदा दिले होते. मात्र काही शाळा, अधिकाऱ्यांकडून त्याचे गांभीर्याने पालन झाले नाही.

मान्यता नसलेल्या 11 शाळांनी प्रणालीवर नोंदणी केली आहे. या शाळांमध्ये 20 पेक्षा अधिक शिक्षक कार्यरत आहेत. याप्रमाणेच मान्यता नसलेल्या 90 शाळांमध्ये 400 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे समोर आले आहे. 681 शाळांमध्ये विद्यार्थी संख्या व इतर माहिती नोंदविलेली नाही.

 

68 अशासकीय शाळांमध्ये शिक्षकांच्या नोंदी झालेल्या नाहीत. 99 अशासकीय शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नोंदी होण्याचे बाकी आहे. 13 पूर्व प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत विद्यार्थी दर्शविले नाहीत.

Leave A Reply

Your email address will not be published.